
न्यायमंदिर नरखेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न
न्यायमंदिर नरखेड येथे राष्ट्रीय लोकन्यायालय संपन्न एकूण १५० प्रकरणी निपटारा.
वार्ता .नरखेड शनिवार दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी नरखेड न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालत चे
आयोजन करण्यात आले विधी सेवा समिती अध्यक्ष तसेच दिवाणी आणि फौजदारी मुख्य न्यायाधीश वृषाली शृंगारे तांबडे मॅडम यांनी लोकन्यायालयाचे उद्घाटन केले. या विशेष प्रसंगी संबोधन करताना ,आयुष्य आनंदाने घालवायचे तर वाद नको संवाद हवा अगदी हीच भूमिका बाळगून पक्षकारांनी त्यांचे आपसातील मतभेद दूर करून सामंजस्याने आपले प्रकरणे आपसात मिटवावेत असे आव्हान उद्घाटन मूर्तींनी केले. याप्रसंगी तालुका वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट सी बी बागडे ,विधी सेवा समिती पी एल व्ही एडवोकेट सुदेश मानकर ,एडवोकेट एम पी तिवारी ,एडवोकेट क्षीरसागर ,एडवोकेट अजय नारनवरे, एडवोकेट वृषाली भुजाडे ,एडवोकेट अनवाने ,एडवोकेट पवन वाडीवे , एडवोकेट मनोज तसेच नाझर बी,जी बनकर लघुलेखक कुलकर्णी,वरिष्ठ लिपिक एस एम रावडे ,पी एम सुरजुसे ,महाजन ,गिरी ,प्रवीण भोयर, बी एस काटे, देशमुख, सांगळे आणि अनिल लष्करे तसेच पोलीस शिपाई दिनेश कुमेरिया, पोलीस नायक रवींद्र कांबळे हे हजर होते.
नरखेड तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बँका वित्तीय संस्था पंचायत समिती ग्रामपंचायतचे अधिकारी हे देखील उपस्थित राहिले लोकन्यायालयास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून नरखेड न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे चेक बाउन्स प्रकरणे 10 कौटुंबिक वाद प्रकरणे ४ ,दिवाने प्रकरणे ४, फौजदारी प्रकरणे १, प्ली गिल्टी प्रकरणे प्रकरणे ६४, प्रि लिटिगेशन प्रकरणे ६७ अशी एकूण १५० प्रकरणे निकालात काढण्यात आली . फौजदारी समझोता प्रकरणे दंडाची किरकोळ प्रकरणे वाद पूर्व बँकेची प्रकरणे, आणि घरकुल प्रकरणे अशा प्रकरणांचा समावेश यामध्ये होता
न्यायाधीश वृषाली शृंगारे तांबडे यांनी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा बाबत आभार व्यक्त केले.
