
पत्रकाराचीच सुपारी – आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे – पुण्यात गुन्हेगारांनी तब्बल दोन वेळा संबंधित पत्रकाराला जीवे पत्रकाराचीच सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींकडून पत्रकारावर दोन वेळा हल्ला करण्यात आला. अखेर या प्रकरणातील निष्ठूर आरोपींना शोधून काढण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे.आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त आहेत. विशेष म्हणजे पुणे पोलिसांना आरोपींकडे हत्यारं देखील सापडली आहेत. संबंधित प्रकरण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. एखादी व्यकी शुल्लक कारणावरुन इतक्या खालच्या टोकावर कशी जाऊ शकते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी प्रथमेश उर्फ शंभू धनंजय तोंडे आणि अभिषेक शिवाजी रोकडे यांना अटक करण्यात आलीय. या गुन्ह्यात चार अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपींकडून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून एक गावठी पिस्तूल, एक जीवंत काढतूस, तीन कोयते, चार दुचाकी, तीन मोबाईल असा एकूण 2 लाख 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त स्मार्ट पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पत्रकारावर मे आणि जून महिन्यात जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. पिस्तुलातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. अखेर आरोपींना जेरबंद करण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे