गौतमी पाटील मंचावर नृत्य सादर करतांना छत कोसळले

छत्रपती संभाजीनगर :वैजापूर तालु्क्यातील महालगाव येथील गौतमीच्या कार्यक्रमात असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला. तो असा कि येथील कार्यक्रमात गौतमी पाटील मंचावर नृत्य सादर करत असताना समोर तुफान गर्दी जमली होती. तुडुंब गर्दी झाल्याने काही तरुण दुकानाच्या पत्र्याच्या छतावर बसले होते. कार्यक्रम रंगात आला असताना छतावर वजन जास्त झाल्याने हे शेड खाली कोसळलं. सुदैवाने यात कोणाला गंभीर दुखापत झालेली नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.नर्तकी गौतमी पाटील हिचा ८ मे रोजी वैजापूर येथील महालगाव येथे नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती. जागा कमी पडल्याने काही जण दुकानाच्या पत्र्याच्या छतावर बसले होते. गौतमीचे चाहचे मिळेल त्या जागी उभे राहून कार्यक्रम पाहत होते. हा कार्यक्रम रंगात आला असतानाच एकच गोंधळ उडाला. कारण ज्यावर गौतमीचे चाहते बसले होते ते पत्र्याचे छतच खाली कोसळले.सुदैवाने यात कुठलीही मोठी दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे. दरम्यान, या घटनेची एकच चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. गौतमी पाटील म्हटले की चर्चा होणारच अशा प्रतिक्रिया लोकांमधून ऐकायला मिळत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close