
पोटच्या पोरीला केमिकलने जाळण्याचा प्रयत्न केला,
लखनऊ: उत्तर प्रदेशात एक अत्यंत भयंकर घटना घडली आहे. येथे बापाने आपल्याच पोटच्या पोरीला केमिकलने जाळण्याचा प्रयत्न केला, 
तकंच नाही तर त्याने मुलीच्या तोंडातही केमिकल टाकलं. इतकं करुनही बापाचा राग शांत झाला नाही. त्याने मुलीचा गळा दाबून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याच २२ वर्षीय लेकीसोबत इतकं भयंकर कृत्य करणाऱ्या निर्दयी बापाला आणि त्याला साथ देणाऱ्या भाऊजी पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुलगी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
उत्तर प्रदेशातील बरेली येथील एका २२ वर्षीय मुलीला तिच्या बापाने आणि भाऊजीने जिवंतपणी मरणयातना दिल्या. २२ एप्रिलला फतेहगंज पश्चिम येथे रस्त्याच्या कडेला एक मुलगी बेशुद्ध पडलेली पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला उचलून रुग्णालयात नेले. मुलीचं शरीर केमिकल टाकून जाळण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले. यादरम्यान मुलीने एका कागदावर लिहून स्वतःची आणि कुटुंबाची माहिती दिली.
भाकरी ही फिरवावी

आगामी निवडणुका लक्षात घेता युवा नेतृत्वाला संधी देण्याचं शरद पवार यांचं नियोजन आहे. महापालिका निवडणुकीमध्ये संघटनेच्यावतीने निवडणूक लढवण्याची संधी दिली जाईल. त्यामधून एक नवे नेतृत्व तयार केलं जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असं पवार आज युवकच्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
