सदानंद कदम  यांना इडी कडून अटक !

मुंबई :   अनिल परब  यांचे निकटवर्तीय असलेले सदानंद कदम  यांना ई़डीने काल चार तासांच्या चौकशीनंतर अटक केली. त्यानंतर त्यांना आज हॉलिडे कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात ईडीच्या वकिलांनी त्यांची 14 दिवसांची कोठडी मागितली. पण कोर्टाने सदानंद कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल परब यांच्या सांगण्यावरुन सदानंद कदम यांनी विभास साठे यांच्यासोबत 80 लाखांचा व्यवहार केला. जवळपास 54 लाखात साई रिसॉर्टची बांधणी करण्यात आली. पण ऑन रेकॉर्ड त्याची किंमत साडेतीन कोटी रुपये दाखवण्यात आली. त्यामुळे हे सगळे पैसे नेमके कुठून आले? याचा तपास आम्हाला करायचा आहे. काही साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी करायची आहे. या सगळ्या प्रकारामध्ये खोलवर जाऊन तपास करायचा आहे, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला.विशेष म्हणजे कोर्टात ईडीच्या वकिलांनी सुद्धा अनिल परब यांचं थेट नाव घेतल्याने आता या प्रकरणात अधिकृतपणे अनिल परब यांच्या नावाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.

                 प्रेमातून गर्भधारणा

प्रेमातून अल्पवयीन मुलीची   गर्भधारणा होत घरातच प्रसुती केल्याची धक्कादायक घटना नागपुरात उघडकीस आली. नवजात बाळाचा मृत्यू झाला, तर बलात्कार करणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला .नवव्या वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवरून एका तरुणाशी सुत जुळलं होतं. यानंतर तरुणाने त्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. यातून तिला गर्भधारणा झाली. घरात कोणाला कळू नये म्हणून त्या अल्पवयीन मुलींने स्वतःच घरात प्रसुती करत बाळाला जन्म दिला.

 नागपुरातील ८० टक्के भिकारी गायब झालेत

नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरात एक हजार पेक्षा जास्त भिकारी वर्षानुवर्षे राहतात. पण पोलीस आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. शहरात ९ मार्च ते ३० एप्रिलपर्यंत शहरातील रस्त्यावर भिक मागण्यास बंदीचे आदेश दिले. त्यानंतर नागपुरातील ८० टक्के भिकारी गायब झालेत. शहर सोडून गेलेत.

अर्थसंकल्पातून केवळ घोषणांचा पाऊस विरोधकांकडून आरोप

 14 मार्चला सरकार कोसळणार आहे. आणि आपण पुन्हा सत्तेत येणार नाही याची जाणीव झाल्यानेच सर्वांना खूश करण्याचा साठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पातून केवळ घोषणांचा पाऊस पाडला.  अशी  टीका विरोधकांकडून करण्यात आली. विरोधकांच्या या टीकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाचार घेतला आहे. येत्या 14 मार्च रोजी सरकार कोसळणार नाही. तर राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे, असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप होणार यावर महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे .

 

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close