
कोयता गँगसंदर्भात पुणे पोलिसांना सर्वात मोठे यश
पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या गँगचा म्होरक्याला अटक करण्यात आली आहे. बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे हे गँगचे म्होरके होते. आरोपींकडून दोन कोयते जप्त केली आहेत. यापुर्वी दोन दिवसांपुर्वी कोयता
गॅंगविरोधातील मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केली होती. जंगली महाराज रस्त्यावर कोयते उगारुन दहशत माजवणाऱ्यांना अटक केली होती. पुण्यात होणारी जी-20 परिषद आगामी प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम सुरु केली. पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकूळ रोखण्यासाठी पोलिसांनी मास्टर प्लॅन तयार केला. पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी कोयता गँग, सराईत गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार, मोका मधील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आराखडा तयार केला. पोलिसांनी शहरात कोंबिंग ऑपरेशन रात्रभर राबवले. त्यात अनेक गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी ३ हजार ७६४ गुन्हेगारांची चौकशी गुन्हेगारांकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगने धुमाकूळ घातला होता. दरम्यान कोयता गँगचे अटक केले तिन्ही आरोपी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यांना पोलिसांनी पकडले
Live Cricket
Live Share Market
