
अनिल देशमुख यांना जामीन नंतर दहा दिवस राहवे लागणार जेल मध्ये.
मुबंई :100 कोटी वसुली प्रकरणात, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआय प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. भ्रष्टाचार आणि वसुलीच्या आरोपांचा सीबीआयतर्फे तपास सुरु आहे. या केसमध्ये आज जामीन मंजूर झाला असला तरीही पुढील 10 दिवस त्यांना जेलमधून बाहेर निघता येणार नाही. कारण जामीन मिळाल्यानंतर 10 मिनिटातच या आदेशावर कोर्टाने स्थगिती दिली, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सीबीआयने या जामीनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं कोर्टात सांगितलं. त्यामळे जामीनाच्या अर्जावर 10 दिवसांची स्थगिती मिळावी, अशी मागणी सीबीआयने केली.उच्च न्यायालयाने हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे जामीन मिळाला असला तरीही अनिल देशमुख यांची पुढील 10 दिवस तुरुंगातून मुक्तता होणार नाही, अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या घोटाळ्यात जामीन मंजूर करतानाच कोर्टाने या केसमध्ये कुठेही तथ्य दिसत नाही, असं म्हटलंय. काही अटी शर्थींच्या आधारे अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाल्याचीअशी माहिती अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली.
