
11 मार्च च्या प्रमुख घडामोडी 1)महा. राज्यातील अर्थसंलकल्प, 2)कुकडी पांजरा येथे मेळावा 3)नागपूर मधील भ्रूण प्रकरण 4)भिवापुरात अधिकारी यांची ओली पार्टी !
जागतीक महीला दिना निमित्त कुकडीपांजरा येथे महिंद्रा लि. व बायफ यांच्या संयुक्तपने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महीला मेळावा
मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . शेतकरी महीला बचत गटा तर्फे भाजीपाला व फुलांच्या शेती विषयी मार्गदर्शन करण्यात आले रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. सर्वांना जागतीक महीला दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी मा.सरपंच, महिंद्रा लि.चे अधिकारी व महीला भगिनी जी. सौ.सद्स्या मिनाक्षी संदिप सरोदे उपस्तीत होत्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्प आज, शुक्रवातिसरारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्रीवर भर देण्यात आला असून, सरकारनं या सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ११ हजार कोटींची घोषणा केली. याशिवाय शेतकरी आणि महिला वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या. राज्याच्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
अर्थसंकल्पातून काय मिळालं?
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक स्थापन करण्यासाठी २५० कोटींचा निधी
करोनामुळे अर्थसंकल्पात पंचसूत्रीवर भर
कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर देणार
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्क्यांची तरतूद आता वाढवून ५० टक्के केली आहे.
गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रुपये उपलब्ध करून देणार
६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी
शेततळ्यांसाठी आता ७५ हजार रुपयांचे अनुदान देणार
जलसंपदा विभागासाठी १३२५२ कोटींच्या निधीची तरतूद
सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी महिला आणि नवजात शिशू रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय
आरोग्य विभागासाठी ११ हजार कोटींच्या निधीची तरतूद
कर्करोग व्हॅनसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद
तृतीयपंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देणार
उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी ११६० कोटींच्या निधीची तरतूद, शालेय शिक्षण विभागासाठी २३५४ कोटींच्या निधीची तरतूद
क्रीडा विभागासाठी ३५४ कोटींच्या निधीची तरतूद
ग्राम विकास विभागासाठी ७७१८ कोटींच्या निधीची तरतूद
उपराजधानीतील भ्रूण प्रकरण उघडकीस
लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्वेटा परिसरात काही भ्रूण कचऱ्या ढिगाऱ्यात फेकले होते. या संबंधाने नागपूर महापालिका आरोग्य विभागानी दखल. व पाच रुग्णालयांची झडाझडती घेतली. आरोग्य विभागाचे अधिकारी व पोलीस विभागाने संयुक्त कारवाई करीत सीसीटीव्ही फुटवजे बघितले असता. पुरोहित नर्सिंग हाऊस मधून भ्रूण फेकल्याचे समोर आले आहे.
भिवपुरात दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकाऱ्यांची ओली पार्टी
भिवपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी दारू रिचवत होते. त्यामुळे अधिकारी कार्यालयात पार्टी करतात की जण माणसांची कामे करतात असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.



