
भीष्णूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
दि.09/03/22 ला प्रा.आ. केंद्र भीष्णूर येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये
नरखेड तालुक्यातील सर्व समुदायक आरोग्य अधिकारी,आरोग्य सहायिका,आरोग्य सेविका,औषध निर्माण अधिकारी, तालुका आशा समन्वयक,गट प्रवर्तक तसेच प्रा आ केंद्र भीष्णूर अंतर्गत सर्व अशासेविका व अंगणवाडी सेविका यांना भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळेस सौ नीलिमाताई सतीशजी रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड,श्री प्रवीणजी जोध जिल्हा परिषद सदस्य नागपूर तथा अध्यक्ष रुग्णकल्याण समिती प्रा आ केंद्र भीष्णूर,श्री नरेशजी अरसडे माजी सभापती
पंचायत समिती नरखेड,डॉ विद्यानंद गायकवाड तालुका आरोग्य अधिकारी नरखेड,श्री मोतीरामजी नासरे, श्री प्रकाशजी नासरे,सौ जिजाबाई रेवतकर, सौ छायाताई ठाकरे सदस्य रुग्णकल्याण समिती प्रा आ केंद्र भीष्णूर,डॉ किशोर ढोबळे वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र भीष्णूर,डॉ विशाल यादव वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र भीष्णूर, डॉ मिथुन घोलपे वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र मेंढला, डॉ देवेंद्र बाराई वैद्यकीय अधिकारी प्रा आ केंद्र सावरगाव, सौ निलिमाताई नरेशजी अरसडे सरपंच खरसोली,सौ लोखंडेताई सरपंच खेडीकर्यात,सौ टेकामताई सरपंच मोहदिधोत्रा,सौ मंगला उघडे,सौ प्रमिलाताई घाटोड, श्री नितीनजी घाईवट व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाला सौ नीलिमाताई सतीशजी रेवतकर सभापती पंचायत समिती नरखेड यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रस्तविक व आभार डॉ किशोर ढोबळे यांनी केले व संचालन सौ सविता गजभिये यांनी केले.*



