बेलोना येथे सावित्रीबाई फुले जयंती संपन्न/ ताज्या घडामोडी

 

ढोल ताश्याच्या गजरात काढली शोभायात्रा .पदाधिकरी व ग्रामगीता चार्य महिलांचा करण्यात आला सत्कार .

बेलोना प्रतिनिधी: चंद्रशेखर मस्के

बेलोना येथील गजानन महाराजांच्या मंदिरातून ते बजारचौक येथे माळी समाज बहु उद्देशीय मंडळ व ग्राम दक्षता समिती आणि गावातील स्त्री पुरुष यांच्या सहकार्याने ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली शोभायात्रा .बाजारचौक येथे घेण्यात आला कार्यक्रम या कार्यक्रमाची सुरवात दीप प्रज्वलित करून महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष न.प.हायस्कूल माजी मुख्याध्यापिका उषाताई पोजदार कार्यक्रमाचे वक्ते श्री .जितेंद्र डांगोरे महात्मा फुले समता परीषद काटोल. सौ.पद्माताई गिरडकर माजी शिक्षण सभापती न.परिषद नरखेड. सौ छाया ताई खुरसंगे अध्यक्ष आस्था वस्तीस्तर संघ नरखेड.प्रमुख पाहुणे .उकेश चव्हाण माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नागपूर, कु. दीक्षाताई मुलताईकर सदस्य जि. प. नागपूर, सौ हेमलताताई सातपुते.प.स.सदस्य नरखेड ,लच्छु चंदेल उपसरपंच ग्रामपंचायत बेलोना,राहुल गजबे रिपब्लिकन युवक अध्यक्ष नागपूर जिल्हा,श्री विजय नाडेकर जिल्हाध्यक्ष म. फुले समता परिषद नागपूर, ग्रामगीताचार्य ज्योती बंसोड, माजी सरपंच कीर्ती पऱ्हाते या सर्व वक्ते आणि प्रमुख पाहुणे तसेचअध्यक्ष यांनी आपल्या भाषणातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संपूर्ण जीवनातील घडलेल्या प्रत्येक घटनेवरती तसेच ज्योती बंसोड यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावरती कविता सादर केली.तसेच राहुल गजबे यांनी त्यांच्याकडून भारतीय संविधान पुस्तक दिलेया कार्यक्रमाचे विशेष म्हणजे दीक्षाताई मुलताईकर जि.प. सदस्या नागपूर ,हेमलताताई सातपुते प.स. सदस्या नरखेड ,माजी सरपंच बेलोना कीर्ती पऱ्हाते व ग्रामगीता चार्य ज्योती बंसोड याना शाल श्रीफळ व सावित्रीबाई फुले याची प्रतिमा देऊन यांचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे संचालन संजय बारमासे प्रस्तावना मयुर सातपुते आभार प्रणय सातपुते ने केले असून हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी गावातील माळी समाजातील युवा तरुण मित्र मंडळीनी व ग्राम दक्षता समिती यांनी सहकार्य केले असून गावकरी जनतेनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close