
शिवभोजन थाळीवाटपात केंद्रचालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये घशात !

मुंबई ( वृत्तसेवा) : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवभोजन थाळीवाटपात केंद्रचालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर असे गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांना ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश अन्न व नागरीपुरवठा विभागाने काढले आहे. राज्यातील काही शिवभोजन केंद्र चालक एकाच ग्राहकाचे छायाचित्र वेगवेगळ्या नावांनी वापरून शिवभोजन थाळी वाटपात केंद्रचालकांकडून खाेट्या नाेंदी दाखवून लाखो रुपये लाटले जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यासह चित्रा वाघ यांनी सुद्धा नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशन काळात केला होता. शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण करून देण्यासाठीच शिवभोजन योजना सुरू केली आहे. शिवाजी महाराजांच्या नावे या योजनेत भ्रष्टाचार होत असून, हा महाराजांचा अपमान असल्याचे सांगून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचे विधिमंडळात वाभाडे काढले होते.या आरोपानंतर असे गैरव्यवहार टाळण्यासाठी राज्यातील सर्व शिवभोजन थाळी केंद्राच्या संचालकांना आदेश अन्न व नागरीपुरवठा विभागाने काढले देण्यात आल्याची माहिती आहे तर शिवभोजन केंद्रचालकांनी स्वखर्चाने हे कॅमेरे बसवायचे आहेत. याबाबत राज्य शासनाचे आदेश नुकतेच प्राप्त झाले असून, जबाबदारी स्थानिक स्तरावरील अधिकाऱ्यांवर सोपवली असल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व शिवभोजन केंद्रावर ३१ जानेवारीपर्यंत सीसीटीव्ही कॅमरे बसविले आहेत किंवा नाही, याची तपासणी करून कार्यवाही करावी. शिवभोजन केंद्राचे देयक देताना तक्रार आल्यास सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी. तक्रारीवर अंतिम आदेश येईपर्यंत सीसीटीव्ही फुटेज गहाळ होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. सरकारच्या निर्देशानुसार शिवभोजन थाळीत खाद्यपदार्थ मिळतात का, पिण्याचे पाणी स्वच्छ आहे का, हेही यानिमित्ताने तपासता येणार आहे.
हेआदेश प्रत्येक शिवभोजन केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत केंद्राच्या क्षमतेनुसार त्यांची संख्या असावी प्रत्येक कॅमेऱ्यात शिवभोजन दिसायला हवे आणि केंद्रचालकाने कमीत कमी ३० दिवसांचे फुटेज तपासणीसाठी उपलब्ध होईल, याची दक्षता घ्यावी आणि आवश्यकता भासेल तेव्हा हा सर्व डाटा तपासणीसाठी पेन ड्राइव्हमधून अधिकाऱ्यांना द्यावा आणि वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था करून अखंड फुटेज मिळेल, याची काळजी घेण्याची जबाबदारी केंद्रचालकांनी घ्यावी असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे
