बेलोना सर्कलमध्ये भाजपमध्ये चुरस — वृंदा प्रवीण लोहे यांचे नाव आघाडीवर

बेलोना सर्कलमध्ये भाजपमध्ये चुरस — वृंदा प्रवीण लोहे यांचे नाव आघाडीवर
पाणवाडी प्रतिनिधी – नरखेड:आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरखेड तालुक्यातील बेलोना सर्कलमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तालुक्यातील चार जिल्हा परिषद सर्कलपैकी तीन महिला राखीव असल्याने नेत्यांच्या गृहलक्ष्मी राजकारणात उतरल्या असून, सर्कलमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

भिष्णूर आणि बेलोना हे राजकीय दृष्ट्या प्रभावशाली सर्कल मानले जातात. याच सर्कलमधून अनेक सभापती आणि जनप्रतिनिधी उदयास आले आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष या सर्कलमध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.

भाजपच्या गोटातून माजी सभापती बबनराव लोहे यांचा मुलगा प्रवीण लोहे हे आमदार परिणय फुके व आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या निकटवर्तीय मानले जातात. त्यांनी बेलोना परिसरात सातत्याने कार्य करत जनतेत आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी वृंदाताई प्रवीण लोहे या बेलोना सर्कलमधून भाजपच्या प्रमुख दावेदार म्हणून पुढे येत आहेत.

दुसरीकडे काँग्रेसकडून योगिता मंगेश रामदे यांच्या नावाची चर्चा रंगली असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही प्रभावी उमेदवाराची पडताळणी सुरू असल्याचे समजते.

बेलोना सर्कलमध्ये यंदा भाजप स्वच्छ प्रतिमेच्या वृंदा प्रवीण लोहे यांच्यावर विश्वास दाखवणार का, की पुन्हा ठेकेदार गटाच्या बाजूने उभा राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारसंघात यावरच चर्चेचा विषय रंगला आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close