
कळमेश्वर मध्ये वीज पडून तिघांना मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा बु. (ता. कळमेश्वर)येथे दुर्दैवी घटना घडली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. शेतामध्ये वीज पडून झालेल्या दुर्दैवी घटनेत वंदनाताई प्रकाश पाटील व मुलगा ओम प्रकाश पाटील आणि शेतातील काम करणारी महिला निर्मलाताई रामचंद्र पराते यांचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.आमदार आशिष देशमुख यांनी प्रत्यक्ष कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या दुर्दैवी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.या महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.मनोहर कुंभारे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ राजवी पोद्दार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह इतर मान्यवर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
Live Cricket
Live Share Market
