
स्वस्त धान्य विकत घेऊन साठेबाजी करणाऱ्याणा चपराक
स्वस्त धान्य विकत घेऊन साठेबाजी करणाऱ्याणा चपराक कार्ड धारकानी रेशनचे धान्य विकल्यास कार्ड होणार रद्द महाराष्ट्र शासनानी पावसाच्या दिवसातp
नागरिकांना त्रास होणार नाही यांची दखल घेतली आहे पावसाळाचे दिवस पाहता नागरिकांना त्रास होणार नाही म्हणून तीन महिन्याचे राशनचे वाटप करीत आहे. त्यामुळे साठेबाज सक्रिय झाले,आहेत तर काहींनी तर राशन दुकान समोर ठिय्या मांडला आहे. तसेच लोकांन कडून स्वस्त धान्य विकत घेऊन खुल्या बाजारात धान्य विकणारे तस्कर मागील काही दिवसा पासुन सक्रिय झाले आहे. यामुळे नागपूर शहर विभाग कडून धाडी टाकणे सुरु झाले असून माल सुद्धा जप्त करण्यात येत आहे.अन्न पुरवठा विभागाने नागरिकांनी खुल्या बाजारात धान्य न विकण्याचे आवाहन केले आहे. जर कुणी जाणीवपूर्वक स्वस्त धान्य विकताना आढळला तर त्यांचे कार्ड रद्द करण्यात येणार आहे. या हालचाली वर अन्न पुरवठा विभागाची करडी नजर स्वस्त धान्य विकणाऱ्या वर आणि घेणाऱ्या वर असणार आहे.अन्न पुरवठा विभागानी कार्ड धारकांना आवाहन केले विट्यानी युक्त राशन खुल्या बाजारात विकू नये अन्यथा आपले स्वस्त धान्याचे कार्ड रद्द होऊ शकते.
