
उच्चशिक्षित तरुणांकडून शेजाऱ्याची हत्या
उच्चशिक्षित तरुणांकडून शेजाऱ्याची हत्या
नागपुरात शिल्लक करणारं तरुणांनी केली हत्या, धंतोली पोलीस स्टेशन नागपूर अंतर्गत येणाऱ्या राहुल नगरपट्टी परिसरात रविवारच्या रात्री चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली. आरोपी आणि मृतक
शेजारी असून आरोपीला समज देणे मृतकाला भारी पडले. रविवारच्या रात्री शिवीगाळ करणाऱ्या युवकाला समज देणाऱ्या शेजाऱ्याला महाग पडले असून युवकानी त्याची हत्या केली.अंकुश देवगिरकर वय 35 रा. नागपूर असे मृताचे नाव असून आरोपीच्या शेजारी राहतो.
आरोपी उच्चशिक्षित बीएससी चा विद्यार्थी आहे. आयुष मंडपे वय 19 राहणार राहुल नगर रोड पट्टी असे आरोपीचे नाव आहे.
हत्या करण्यामागे आरोपी हा दारू पिऊन परिसरात शिवीगाळ करीत होता. त्याला अंकुश देवगिरीकर यांनी सजविण्याच्या प्रयत्न केला तेव्हा दोघांमध्ये बचाबाची झाली आणि आयुष मंडपेची कॉलर अंकुश नी पकडली त्यामुळे आयुष् हा रागाच्या भरात आपल्या घरी गेला भाजी कापण्याचा चाकू घेऊन आला त्याच्यावर वार सपासप केले आणि घटनास्थळा वरून फरार झाला. जखमी अंकुश ला मेडिकलला नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अंकुश मृत झाल्याची बातमी त्यांच्या मित्रांना कळताच आरोपीच्या घराची तोडफोड केली परंतु धंतोली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती वर नियंत्रण केले. लगेच आरोपीला छत्रपती चौकातून पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनेचा तपास धंतोली पोलीस करीत आहे .
