
तरुणी समोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
तरुणी समोर अश्लील कृत्य केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल
नागपूर शहरातील वर्धा रोड मध्यवर्ती कारागृहासमोर समाजाला लाजवेल अशी घटना एक समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी दोन तरुणी बसल्या असताना एका युवकांनी अश्लील कृत्य केले , याअश्लील कृत्याचा व्हिडिओ कॅमेरात कैद झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृत्य करणाऱ्या आरोपीला धंतोली पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना रविवारच्या रात्री नऊ वाजता घडली असून आरोपीने सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या तरुणी समोर अश्लील कृत्य केले. आरोपी जाणून तरुणींच्या समोर कृत्य करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्या तरुणांनी त्याचा व्हिडिओ तयार करून पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली तेव्हा आरोपी तेथून पळून गेला, आरोपी हा कर्नाटक येथील असून शांत कुमार असे त्याचे नाव आहे. सध्या तरुण हा एका हॉटेलमध्ये मॅनेजर ची ड्युटी सहा महिन्यापासून करीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या मोबाईल मध्ये काही अश्लील व्हिडिओ मिळाल्यामुळे धंतोली पोलीस त्याचा शोध घेत आहे
आरोपीने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या कुत्याबाबत तसेच विनयभंग अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे
