
चाकूचा धाक दाखवून बलात्कार

चाकूचा धाक दाखवून बलात्कार
पुण्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे पुण्यात 19 वर्षीय तुरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर येत आहे. पुणे येथील शिरूर तालुक्यात शनिवारी रात्री दोन तरुणांनी एका 19 वर्षीय तरुणीवर चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला.एवढंच नाही तर आरोपीने पीडितेला आणि तिच्या चुलत भावाला आक्षेपार्ह स्थितीत येण्यास भाग पाडलं आणि संपूर्ण घटनेचा व्हिडिओ देखील बनवला. सध्या संबंधित घटनेची पोलीस कसून चौकशी करत आहेत. पण सतत होत असलेल्या अशा घटनांमुळे महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र समोर येत आहे.
पीडित महिला तिच्या चुलत भावासोबत घराजवळील निर्जन ठिकाणी बसली होती. तेव्हा दोन अज्ञात पुरुष दुचाकीहून त्या ठिकाणी पोहचले. दोघांनी तरुणीला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केले. एवंढच घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, वेळ न घालवता पोलिसांनी आरोपीची माहिती गोळा केली आणि वेगाने शोध सुरू केला. अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. लुटलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केल्याची देखील माहिती समोर आली. पुण्यात स्त्रींयावर सतत होत असलेले अत्याचार पाहता परिसरात खळबळ माजली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी माहिती दिली .
