
शिवजयंतीच्या पर्वावर नामांकन सोहळा
आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या उपस्तितीत काटोल ला शिवजयंती कार्यक्रम आणि पोलीस स्टेशन समोर च्या नगर परिषद स्कुल ला छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलन नामांकन सोहळा पार पडला या प्रसंगी उदघाटन करून काटोल क्षेत्राचा विकास करण्यासाठी कठीबंध असल्या चे प्रतिपादन केले.

काटोल येथील पोलीस स्टेशन नगर परिषद कॉम्प्लेक्स समोरील कॉम्प्लेक्स ला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नामांकन सोहळा 20 फरवरी रोजी पार पडला. काटोल विधानसभेचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या हस्ते नामांकन सोहळा पार पडला विविध मान्यवर उपस्थित होते तर शिवजयंतीच्या प्रवर आयोजित केलेल्या नामांकन सोहळ्याच्या निमित्ताने आमदार चरण सिंग ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले काटोल विधानसभा क्षेत्राचा विकास करणे हे माझे कर्तव्य असून झटत राहणार,.काटोल विधानसभा क्षेत्रातील जाम प्रकल्प आणि चिखली प्रकल्पातील पाणी ते सर्व पाणी शेतकऱ्यांच्या कामासाठी आपण वापरणार आहोत .दोन वर्षात हे पाणी नाल्यांल्याने वाहताना दिसणार नाही, ज्याप्रमाणे देशातील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील एकही नागरिक जुगी झोपडी घेऊन राहणार नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विकास पुरुषामुळे देशाचा आणि राज्याचा विकास होत आहे असे प्रतिपादन शिवजयंतीच्या नामांकन सोहळ्याच्या वेळी आमदार चरण ठाकूर यांनी प्रतिपादन केले, मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश ठाकरे, माझी पंचायत समिती सदस्य सतीश रेवतकर, माजी सभापती संजय डांगोरे,प्राध्यापक कठाणे सर प्रशांत मानकर, विजय महाजन, येवले सर यांनी केले तर आभार प्रशांत मानकर यांनी मानले.
Live Cricket
Live Share Market
