
तरुणाचा कौल जिचकार कडे विधानसभा निवडणूक 2024
तरुणाचा कौल जिचकार कडे विधानसभा निवडणूक 2024 
काटोल प्रतिनिधी: काटोल विधानसभा क्षेत्र हे दिल्लीला भारी असल्याचे बोलले जात आहे तशी स्थिती या विधानसभेच्या निवडणुकीत काटोल मतदार क्षेत्रात दिसत असून .भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्ष हे पक्ष प्रतिस्पर्धी असले तरी तिसरा पर्याय म्हणून काटोल मतदार क्षेत्रात यादवला जिचकार मतदारा समोर उभा आहे. काटोल मतदारसंघात याजवल्य जिचकार यांची प्रचिती पाहता वडील श्रीकांत जिचकार यांचा वसा घेऊन चालत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काटोल विधानसभा एक व्हीआय पी मतदार संघ म्हणून ओळखले जाते.याच विधानसभा क्षेत्रातील डॉक्टर श्रीकांत जिचकर यांचे नाव संपूर्ण भारत नव्हे तर देशात घेतल्या जाते. त्यांचे सुपुत्र याज्ञवल्य जिचकार यांनी अपक्ष म्हणून आपले उमेदवारी अर्ज काटोल क्षेत्रात दाखल केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खेम्यात एकच खळबळ माजली असून जिचकार यांनी आपला नाम निर्देशन अर्ज दाखल केला तेव्हा त्यांच्या रॅलीमध्ये तरुण – तरुणी चा मोठा सहभाग होता. यामुळे जिचकार हे तरुणांचे केंद्रबिंदू ठरले आहे. जिचकार यांनी मागील तीन वर्षात या काटोल विधानसभा क्षेत्रात आपले कार्य सुरू केले आहे प्रत्येक गावागावात फिरून त्यांनी सर्वांच्या समस्या जाणून घेतले आहे.तेव्हा आता नवीन चेहरा हवा आहे असे त्यांच्या मतदार गावा गावा च्या चावडीतून समोर येत आहे आणि महत्त्वाचे बाब म्हणजे या क्षेत्रातील वाढत असलेले बेरोजगारी शेतकऱ्यांच्या समस्या याबाबत जिचकार यांनी प्रत्येक गावागावात रोजगार मार्गदर्शन शिबिर घेतले आणि क्षेत्रातील 200 हुन अधिक बेरोजगार यांना कामे दिली तर मार्गदर्शन शिबिरात त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच आधार कार्ड इतर कार्ड शिबिर त्यांनी घेतले त्यामुळे जिचकार यांच्या प्रभाव काटोल मतदारसंघात नाही असे म्हणता येत नाही.हे या निवडणुकीत एकच दावेदार उमेदवार म्हणून ओळखले जात आहे.तरुण शिक्षित मतदाराची पसंती आता याज्ञवल्य जिचकार आहे.
