
आचारसंहिते काटेकोर पणे पालन करा. पीयूष चिवंडे
आचारसंहिते काटेकोर पणे पालन करानिवडणूक निर्णय अधिकारी- पियुष चिवंडे

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं
एकूण ०२,८०,४८६ मतदार
मतदार ठरवणार काटोल विधानसभेच भवितव्य!
काटोल:केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (१५ ऑक्टोबर) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुतद संपणार आहे. त्याआधीच राज्यात नवं सरकार स्थापन होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. तसंच, राज्यातील मतदारांची संख्याही त्यांनी सांगितली.
त्याच प्रमाणे १६आक्टोबर रोजी काटोल विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पियूष चिवंडे यांनी काटोल विधानसभा मतदारसंघातील सर्व राजकिय पक्षांचे नेत्यांची बैठक घेऊन होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी बाबद माहिती दिली. या प्रसंगी त्यांनी सांगितले की आपण सर्व मिळून
आपल्या काटोल विधानसभेची होणारी निवडणूक भयमुक्त वातावरणात संपन्न करण्यासाठी सर्व जनप्रतिनिधीनीं प्रशासनास मदत करावी. त्याच प्रमाणे पारदर्शी निवडणूक अडथळा आणनार्यां विरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. सोबतच उमेदवारांना खर्चाची मर्यादा, सिमा लगत राज्याचे लगत चार चेक पोस्ट असून, उमेदवाराकडून होणार्या खर्चावर निरिक्षण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूकिला लागणारा मनुष्यबळ व त्यांचे प्रशिक्षण, याबाबत माहिती दिली.तसेचत्यांनी काटोल विधानसभा मतदारसंघात३३२ मतदार केंद्र आहेत. या केंद्रांवरून काटोल विधानसभेत मतदान पार पडेल.
काटोल विधानसभा मतदारसंघात सध्या स्थितीत
काटोल विधानसभा मतदारसंघांतील वयोगटातील
मतदार – एकूण मतदारांपैकी टक्केवारी
१८-१९-:२.०७%
२०-२९-:१९.०५%
३०-३९-:२२.२५%
४०-४९-:२२.०९%
५०-५९-:१५.६९%
६०-६९-:०९.७१%
७०-७९-:०५.८१%
८०-८९+-:०२.७३%
९०-९९–.०.५७%
१००-१०९–०.०३%
:::::::::::::::
काटोल विधानसभा४८
एकूण बुथ-३३२
मतदार -२८०४८६
पुरूष-१४२२४५/७१% -५०.
महिला-१३८२३५/
४९.२८%
थर्ड जेंडर -०६\०.०१
एकूण -२,८०,४८६
सर्व्हिस वोटर-४१३
पी डब्लु डी-१६३३
८५+-४६६६
जेंडर रिओट-९४५
मतदार नोंदणी झालेली आहे.
निवडणूक प्रक्रियेचं संपूर्ण वेळापत्रक
१) राजपत्र अधिसूचना जारी करण्याची तारीख – २२ ऑक्टोबर २०२४
२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर २०२४३)उमेदवारी अर्ज पडताळणी – ३० ऑक्टोबर २०२४४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४५) मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४६) मतमोजणीची तारीख – २३ नोव्हेंबर २०२४७) निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख – २५ नोव्हेंबर २०२४
सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहिती दिल्यानंतर काटोल तालुक्यातील पत्रकारांना ही निवडणूकीत १००% मतदान ह्वावे या बाबतीत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडिया, व अन्य समाज माध्यमातून प्रचार lप्रसार प्रसिध्दी साठी आप आपल्या वृत पत्रात स्थान देन्याचे आवाहन काटोल विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी,उपविभागीय अधिकारी एस डी एम काटोल पियूष चिवंडे यांनी केले आहे
.प्रसंगी काटोल विधानसभा मतदारसंघातील सर्व मान्यताप्राप्त तसेच नोंदणीकृत राजकिय पक्षांचे नेते व पत्रकार यांचे समक्ष काटोल चे तहसीलदार राजू रणवीर, यानी ही निवडणूक प्रक्रियांचेनियमावली ची माहिती दिली. या प्रसंगी नरखेड चे तहसीलदार सुनिल खोडके काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब रोहम , काटोल /कोंढाळी न प चे सी ओ धनंजय बोरिकर,-नायब तहसीलदार व सह निवडणूक अधिकारी विजय डांगोरे ,भागवत पाटील, नायब तहसीलदार संजय भुजाडे , सुनीता चल्लावार , काटोल व नरखेड पंचायत समिती चे बी डि ओ तसेच मनिष चरडे उपस्थि.त होते.
Live Cricket
Live Share Market
