
एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी घेतला गळफास
मोवाड मधून मोठी बातमी.
एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी घेतला गळफास मृतकात दोन मुले आई वडील यांचा समावेश. नरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोवाड येथे पिचोरी कुटुंबातील चार सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन आक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.
मृतकात दोन मुले आई-वडील यांचा समावेश असून विजय मधुकर पिचोरी 64 वडील तर माला विजय पिचोरी 54 आई आणि डीकू विजय पिचोरी 40 तर गणेश विजय पिचोरी 35 अशी मृकांची नावे आहेत.सदर मूतक कुटुंबीय मोवाड येथे खोब्रागडे यांच्या घरी भाड्याने राहत होते. पिचोरी कुटुंबीयांनी गळफास का घेतली याचे कारण समोर आले नाही. परंतु मृतकांची
हात बांधून असल्याने त्यांनी आत्महत्या केली की हत्या यावर तर्क वितर्क लावल्या जात आहे परंतु पिचोरी कुटुंबीयावर कर्ज असलेल्या चर्चा जोरात असल्याने पोलीस
विभागाला पिचोरी कुटुंबीयांनी आत्महत्या केली की घातपात झाला असावा याचा तपास पोलीस करीत आहे.
