
नरखेड मध्ये भर पावसाळात पाण्याची टंचाई.
नरखेड मध्ये भर पावसाळात पाण्याची टंचाई.
पाणवाडी प्रतिनिधी : काटोल मतदार संघातील दुसरी आणि क गटात मोडणारी नरखेड नगर परिषद आहे.या नगर परिषद वर प्रशासक कार्यरत आहे. मुख्यधिकारी
यांच्या हलगर्जीपणामुळे नरखेड शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, भर पावळात पाण्याच्या तेरावा महिना अशी परस्तिती नरखेड शहराची आहे.नरखेड शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या भर पावळात निर्माण झाली. यामळे नागरिकात नगर परिषदेचे च्या प्रशासक च्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात मुबलक पाणी असताना, पावसाळात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली असून नारिकांना दोन दोन दिवस पाणी मिळत नाही. या शहराला पाणी पुरवठा चिखली धरणा वरून केल्या जातो.या धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणारी पाईप लाईन फुटल्या मुळे नरखेड वशियांना पाणी मिळत नाही सांगण्यात येत आहे. परंतु पाईपलाईन फुटण्याचे कारण सांगून नगरपरिषद आपले कर्तव्य व्यावरून दूर जात आहे. मुख्यधिकारी यांच्या नाकर्तेपणा दोन
महिन्या पासुन नरखेडवाशीना पिण्याच्या पाण्या पासुन वंचीत ठेवीत आहे. पाण्याची समस्या घेऊन नागरिकांनी नगर परिषदे ला निवेदन दिले आहे. परंतु मुख्यधिकारी लक्ष देत नसल्याने नागरिकात रोष निर्माण झालेला आहे. परंतु लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेत आहे.
