
भारसिंगी ते जामगांव रोड वरील अपघातात दोन्ही इवाई यांचा मृत्यू .
भारसिंगी ते जामगांव रोड वरील अपघातात दोन्ही इवाई यांचा मृत्यू
जाललखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भारशिंगी ते लोहारी सावंगा मार्गावरील झोलवाडी फाट्यावर घडली काल रात्री ७.३० वाजताच्या दरम्यान मृतक नामे लखन येदुजी चिंचोरीया रा. कारला व सुरेश अर्जुन पडोलीया रा. वाढोना, काटोल हे दोघे आपल्या दोनचाकी वाहण क्र MH 31 BD 8189 या गाडीने
रामचंद्र कुमेरिया जामगाव फाटा यांच्याघरी कौटुंबिक परिवारात नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमला जात असताना रोडवर उभा अवस्थेत असलेल्या डंपर क्र MH 49 AT 9051 वर दुचाकी धडकल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक हा सुप्रीमो खासगी कँपनीचा असून हा डम्पर रोडवर उभा होता तेव्हा कोणत्याही प्रकारचे लाईट सुरू नसल्याने हा अपघात झाला सध्या या परिसरात या कँपणीच्या मालवाहू गाड्याची वर्दळ असून नियमबाहेर वाहतूक करत आहे त्यामुळे हा अपघात झाला सदर वाहन चालक गाडी टाकून पळाला असून पोलीस गाडीमालक व वाहन चालक यांचा शोध घेत असून जलालखेडा पोलीसांनी अपराध क्रमांक 221/24 कलम 304 (अ), 283 भादवी सहकलम 134, 122, 177 भादवी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सह पोलीस पपिण रामटेके करत आहे
