
बेलोना नगरीत श्री बालमुर्ती बजरांगबलिचे ब्रम्ह मुहर्ता वर आज झाले आगमन,तीन दिवसीय रथ यात्रा.
बेलोना नगरीत श्री बालमुर्ती बजरांगबलिचे ब्रम्ह मुहर्ता वर आज झाले आगमन

आज रात्री निघणार बजरंग बलीचा रथा गावामधे मिरवणुकीसाठी
बेलोना प्रतिनिधी .चंद्रशेखर मस्के
श्री क्षेत्र बेलोना येथे आजपासून सुरू झालेल्या रथ यात्रेचा पहिला दिवस असून आज पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती बजरंग बलीचे गावातील दिंड्या शिवगर्जना ढोल ताशा पथक पवनसुत ढोल ताशा पथक हनुमान चालीसा मंडल यांच्या गजरात मंदिर परिसर राम नामाच्या गजरात असंख्य भक्ताच्या जयघोषात आज बजरंग बलीचे आगमन झाले. यावेळेस पहाटे मंदिरात काकडा , हनुमान चालिसा ,आरती होऊन मंदिर ट्रस्ट महाराज यांच्याकडून महाप्रसादाचा महाभोग दाखवण्यात आला .या यात्रेचे विशेष म्हणजे ही हनुमंताची स्वयंभू जमिनीतून निघालेले मूर्त असून या मूर्तीचे दर्शन फक्त वर्षातून तीनच दिवस होत असल्यामुळे येथे महाराष्ट्र मध्यप्रदेश संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. आज बजरंग बलीचे आगमन झाले असून आज संपूर्ण दिवसभर पूजा अर्चना अभिषेक भजन चालणार असून सायकळी आठ वाजता बजरंगबलीला रथामध्ये ठेवून गावातील संपूर्ण दिंड्या, महिला भजन मंडळ वारकरी भजन मंडळ तसेच ढोल ताशा पथक हनुमान चालीसा मंडळ राम-लक्ष्मण सीता यांची झाकी राम नामाचा गजरात रथाची मिरवणूक निघणार असून यात गावातील जनता चौका चौकात चका दूध महाप्रसादाचा वाटप होईल .उदयाला म्हणजेच दि.26 दुसऱ्या दिवशी बजरंग बलीचा रथ जीवना नदीच्या तीरावर विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात भकतांच्या दर्शनासाठी जागेवर राहील दि.27 परवा पहाटे सुंदर कांड हनुमंताची महापूजा होऊन बजरंग बलीच्या रथाला भव्य फुलांच्या माळाने सजावट करून सकाळी दहा वाजता बजरंग बलीची रथातून भव्य मिरवणूक निघेल . गावातील तसेच बेलोना परिसरातील संपूर्ण दिंड्या वारकरी भजन मंडळ महिला वारकरी भजन मंडळ ढोल ताशा पथक हनुमान चालीसा मंडळ बँड पार्टी तसेच इतर वेगवेगळ्या वेशभूषांनी सजवलेले देवाचे देखावे असेल . सायंकाळी रथ बाजार चौक येथे श्री राम मंदिर जवळ आल्यास हनुमंताने रामाचे दर्शन झाल्यास गोपाला काला होईल .रथाला मंदिर परिसरात आणून मोठा मारोती आणि बजरांगबली यांची दृष्टी ऐक करून महाआरती होईल .रात्रीला शिवगर्जना ढोल ताशा पथक त्यांच्याकडून मानवंदना होईल. रात्री बाराच्या नंतर बजरंग बलीला रथातून काढून रेशमी कापडात बांधून पुन्हा वर्षभरासाठी रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यात पुन्हा बंदिस्त करून ठेवण्यात येईल.
शोभायात्रेमध्ये गावकरी बेलोनामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जमेल तसे चौका चौकात आलू भात पोहा चणे हलवा पुरी जेवण अशी निशुल्क व्यवस्था करतात. तसेच रथयात्रा उत्सव समितीच्या वतीने बाहेरगावावरून येणारे तसेच गावातील भजनी दिंड्या पथक बँड पार्टी प्रमुख पाहुणे यांना मानपान सुद्धा देण्यात येतो.



