खानगाव येथील बारा वर्षीय बालकाचा मृत्यू

खानगाव पारधी बेडा काटोल येथे आज सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली कचरा डम्पिंग साठी खोदलेल्या खोल गड्ड्यात पाणी साचल्याने त्यात पडून बारा वर्षे विराट राणा पवार बालकाचा मृत्यू झाला.
हा गटार काटोल नगर परिषदे कडून डम्पिंग साठी तयार करण्यात आला होता मात्र पावसामुळे तेथे पाणी साचले होते स्थानिक नागरिक आणि पारधी समाजाने अनेकदा ही ठिकाणे धोकादायक असल्याचे सांगून गटारे बुजविण्याची यमागणी केली होती मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर परिसरात शोखकाळा पसरली असून नगरपरिषद व संबंधित कंत्राटदार विरुद्ध कडक करण्याची मागणी होत आहे पोलिसांनी पंचनामा करून शव विच्छेदनासाठी पाठवले असून पुढील तपास काटोल पोलीस करीत आहे

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close