
बाईक विकणं तिला पडलं महागात, बसला हजारोंचा फटका
नागपूर | नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचा हा गुन्हा घडला. पारूल सोनी या तरूणीने (OLX) ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावर दुचाकी विकण्याची जाहिरात अपलोड केली होती. ती जाहिरात पाहून सचिन नावाच्या इसमाने तिला फोन केला आणि बाईक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने पारुल सोनी हिला गाडी पाण्याच्या बहाण्याने केडीके कॉलेजजवळ बोलावले.दोघेही तेथे पोहोचल्यानंतर सचिनने पारुलला बाईकची ट्रायल घेण्याबद्दल विचारले. तिने होकार दिल्यानंतर तो बाईकवर बसला आणि पुढे गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आलाच नाही. अखेर तो बाईक घेऊन फरार झाल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे पारुल हिच्या लक्षात आले. तिने तातडीने नंदनवन पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार कथन करत यासंदर्भात तक्रार नोंदवली. बाईक चोरीच्या या घटनेसंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान कोण कोणाची फसवणूक कशा प्रकारे करेल याचा काही नेम नाही त्यामुळे कुठलाही व्यवहार करताना सावध राहून करणे गरजेचं आहे , असा सल्ला देत पोलिसांनी सर्वांना सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले.Live Cricket
Live Share Market



