शिक्षिकेच्या बॉयफ्रेंडने विद्यार्थ्याला का संपवलं ?

कानपूर | 1 नोव्हेंबर 2023 : अवघ्या १० व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीम मुलाच्या निर्घृण हत्येमुळे शहर हादरलं आहे. शहरातील कापड व्यापारी मनिष कनेडिया यांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येमुळे फक्त कुटुंबच नव्हे तर शहरातही शोककळा पसरली आहे.

या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रभात, शिक्षक रचित वत्स आणि शिवा यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरचे कापड व्यापारी मनीष कनोडिया यांचा मुलगा कुशाग्र कनोडियाच्या हत्येतील मुख्य आरोपी प्रभातने सांगितले की, त्याचे रचित वत्ससोबत प्रेमसंबंध आहेत. रचित मुलांची शिकवणी घ्यायची. २ वर्षांपूर्वी कुशाग्र हा रचितकडे ट्यूशनसाठी यायचा, पण नंतर काही काळाने त्याने ट्यूशनासाठी येणं बंद केलं. मात्र असं असलं तरीही रचित आणि कुशाग्र हे एकमेकांना भेटायचे. त्या दोघांचे अफेअर होते, असा संशय प्रभातला आला आणि तो ही गोष्ट सहन करू शकला नाही. आपल्या आणि रचितच्या प्रेमाच्या मार्गातून हटवण्यासाठीच त्याने प्लान आखला. कुशाग्र त्यांच्या स्कूटीवरून कोचिंगसाठी जात होता. आधीच प्लान आखल्यानुसार, प्रभातने कुशाग्रला थांबवले. काहीतरी सबब सांगत त्याने घरी जाण्यासाठी कुशाग्रकडे लिफ्ट मागितली. कुशाग्र हा प्रभातला आधीपासूनट ओळखत होता, त्यामुळे त्याने त्याला स्कूटीवर लिफ्ट दिली. घराजवळ पोहोचल्यानंतर प्रभातने त्याला कोल्डड्रिंक पिण्याच्या बोलावले आणि घराजवळच्याच एका रिकाम्या खोलीत घेऊन गेलाआतमध्ये गेल्यावर प्रभातने जवळच असलेली दोरी घेऊन कुशाग्रचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच ठेवण्यात आला. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, पण तोपर्यंत आरोपी कुशाग्रच्या मृतदेहाची विल्हेवाट लावू शकले नाहीत. त्यांनी मृतदेह त्याच खोलीत ठेवला.कुशाग्रला मारल्यानंतर, कोणीही त्यांच्यावर संशय घेऊ नये, म्हणून प्रभातने त्याच्या अपहरणाचा बनाव करण्याचा करण्याचा दुसरा डाव रचला. आरोपी प्रभातने कुशाग्रच्या घरी पत्र पाठवून खंडणीची मागणी केली होती. आम्हाला तुमचा सण खराब करायचा नाही आणि कोणतेही नुकसान करायचे नाही, असेही पत्रात लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी कुटुंबाकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीसाठीच कुशाग्रचे अपहरण झाले असाव, असे लोकाना या पत्राद्वारे वाटेल असा प्रभातला संशय होता.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close