मनोज जरांगे यांच्या न ऐकलेल्या गोष्टी माहीत आहे काय?

मला फक्त आरक्षण घ्यायचं आहे”

अन् सहकाऱ्यांसाठी दोन वर्ष घर सोडलं... मनोज जरांगे यांच्या न ऐकलेल्या गोष्टी माहीत आहे काय?संभाजीनगर |मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं तेव्हा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची अवस्था समाजासमोर मांडली होती. पत्र्यांचं घर आणि अगदी महिनाभर पुरेल इतकं रेशन हीच त्यांची संपत्ती होती. ही परिस्थिती समोर आल्यानंतर समाजातील अनेक धनिकांनी मनोज जरांगे यांना देणगी स्वरूपात मदत देऊ केली. पण मनोज जरांगे ही मदत घ्यायला तयार होईनात. लोक मदत देण्यासाठी घरापर्यंत पोचले तेव्हा त्यांनी बायकोला घराला कुलूप लावून बाहेर जाऊन बसायला सांगितलं.

मी सुद्धा जेव्हा मनोज जरांगे यांना या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत यात काहीच वाईट नसतं उलट पूर्वीच्या काळी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या जाहीर मिरवणूका काढल्या जायच्या आणि मदत म्हणून त्यांना पैश्यांच्या थैल्या दिल्या जायच्या, त्या स्वीकारल्याही जात असत. एखादा निष्ठावंत व्यक्ती अशा थैल्या सामाजिक कार्याला देऊन टाकत असे. त्यामुळे या देणग्या स्वीकारल्या पाहिजेत, अशी भूमिका मी मांडली. त्यावर मनोज जरांगे यांनी “मी फाटका म्हणून जन्माला आलोय. मला फाटका म्हणून मारायचं आहे. मला देणग्या नाही घ्यायच्या. मला फक्त आरक्षण घ्यायचं आहे” असं स्पष्ट सांगितलं…पुढे मनोज जरांगे यांच्या जुन्या संपर्कातील बीड जिल्ह्यातील एक माजी आमदार त्यांना भेटायला आले. त्यांनी मनोज जरांगे यांना त्यांच्या एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च मी उचलतो, असं सांगितलं. त्यावर मनोज जरांगे यांनी त्याच तडफेने उत्तर दिलं, “माझ्या मुलीचं शिक्षण तुम्ही करायला तिचा काय बाप मेलाय का?” असा सवाल विचारला, आणि त्या माजी आमदारांना स्टेजवरून जायला सांगितलं

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close