डोळंबा येथे गटविकास अधिकारी यांच्या हस्ते पांदण रस्त्याचे भूमिपूजन

अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
तालुक्यातील डोळंबा येथे दि. २६ ऑक्टोबर रोजी
मग्रारोहयो व जिल्हा नियोजन समितीकडुन प्राप्त निधीतून अभिसरणाच्या माध्यमातून सरपंच सुभाष जाधव यांच्या शेताकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याचे भूमिपूजन पंचायत समिती गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली.”आयुष्मान भारत योजना” योजनेमधून लाभार्थ्यांना उपचारासाठी दरवर्षी ५ लाख रुपये इतकी रक्कम त्यांना त्यांच्या आरोग्य योजना मार्फत देण्यात येत असते. गावातील सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे खारोडे यांनी सांगितले पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पहिला हप्ता उचलून अध्याप पर्यंत घरकूल न बांधणाऱ्या लाभार्थ्यांना बोलावून मोलाचे मार्गदर्शन केले व तातडीने घरकुल बांधण्यास सांगितले. गावातील उपस्थीत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे समाधान केले. तदनंतर डोळंबावाडी येथे बांधलेल्या सार्वजनिक शौचालयाची पाहणी केली. यावेळी सरपंच सुभाष जाधव, उपसरपंच पपिता जाधव, किशोर जाधव, ग्राम सदस्य संजय राऊत, ए.पि.ओ. महेश देवतळे घरकूल विभागाचे विश्वजित जाधव, संतोष हणवते,धीरज चव्हाण ग्रामसेवक राजू कुरकुले, ग्रामपंचायत ऑपरेटर आनंद दुबे,जीवन भगत,नवनीत अक्कलवार,विनोद राठोड,दिनेश पतंगे,प्रल्हाद चव्हाण,साहेबराव राठोड व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close