शिल्पा विद्यार्थी शकीलच्या प्रेमात पडली, मग नवऱ्याला संपवण्यासाठी असं रचल भयंकर कारस्थान
October 21, 2023
59 Less than a minute
जयपूर : कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर सूत जुळल्यानंतर एका महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. या महिलेच लग्न झालं होतं. तिच नाव शिल्पा खेमका आहे. कोचिंग क्लासला येणारा विद्यार्थी मोहम्मद शकीलवर तिचा जीव जडला. दोघे परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडाले. शिल्पाला, तर आपला नवरा, कुटुंब आहे याचा सुद्धा विसर पडला. शिल्पा मोहम्मद शकीलच्या प्रेमात इतकी बुडाली की, नवऱ्याचा तिला अडसर वाटू लागला. यातूनच एक भयानक कारस्थान जन्माला आलं. ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. शिल्पा खेमका या कोचिंग क्लासमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती. याच दरम्यान तिची मोहम्मद शकीलबरोबर ओळख झाली. शकील आणि शिल्पा दोघांच्या कॅफेमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. नवरा वाटेत अडथळा ठरत असल्यामुळे तिने त्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला.शिल्पा बऱ्याचकाळापासून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याच्या हत्येच प्लानिगं करत होती. याआधी सुद्धा पूर्ण योजनेसह नवऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश मिळाल नव्हतं. शिल्पाने आधी पती सुनील खेमकाला झोपेच्या गोळ्या मिसळलेलं दूध पिण्यासाठी दिलं. सुनील गाढ झोपल्यानंतर तिने प्रियकर मोहम्मद शकीलला घरी बोलावलं. शिल्पाने हत्येसाठी प्रियकराच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली होती. त्यामुळे शकीलसोबत त्याचा मित्रही आला. शिल्पा आणि तिच्या प्रियकराने आधी उशीने सुनीलच तोंड दाबलं. त्यानंतर सुपारी घेणाऱ्याने चाकूने वार करुन सुनीलची हत्या केली. या प्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी शिल्पा तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्याला अटक केलीय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.