प्रकाश आंबेडकर यांचा हादरा देणारा गौप्यस्फोट काय?उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोठी अंडरस्टँडिंग;

उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मोठी अंडरस्टँडिंग; प्रकाश आंबेडकर यांचा हादरा देणारा गौप्यस्फोट काय?नागपूर | 25 डिसेंबर 2023  वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा अजूनही इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या 48 जागा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काहीच होत नसेल तर आम्ही लोकसभेच्या 48 जागा मोठ्या ताकदीने लढवू, असं प्रकाश आंबेडकर यांनी कालच सांगितलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत काय अंडरस्टँडिंग झाली होती, याचा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.प्रकाश आंबेडकर आज नागपुरात आहेत. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठरलेलं सिक्रेटही सांगितलं. उद्धव ठाकरे आणि आमची आधीच युती झाली आहे. आमच्या दोघात एक गोष्ट ठरली आहे. शिवसेने आणि काँग्रेस किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी झाली नाही तर शिवसेना आणि वंचितने 50-50 जागा लढवण्याचं आमच्या ठरलं आहे. म्हणजे लोकसभेच्या 24 जागा उद्धव ठाकरे आणि 24 जागा आम्ही लढणार असं मोघम ठरलं होतं. आमच्यात ही मोघम अंडरस्टँडिंग झाली आहे, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close