दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरूणावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर | एक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने तरूणावर जीवघेणा हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार उल्हासनगर  जवळ घडला. . पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

15 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्या दिवशी उल्हासनगर १ परिसरात राहणारा कुणाला सिंह चव्हाण हा तरूण उल्हासनगर कॅम्प 1, बिर्ला गेट जवळ ताक पिण्यासाठी गेला होता. त्याचवेळी आरोपी, रमेश तलवार हा तिथे आला आणि दारू पिण्यासाठी त्याने कुणाल चव्हाण याच्याकडे पैसे मागितले. मात्र कुणालने त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्याच मुद्यावरू आरोपी रमेश हा कुणालशी वाद घालू लागला. त्यांचं भांडण चांगलंच पेटलं.

थोड्यावेळाने कुणाल हा त्याच्या घरी परत जाण्यासाठी निघाला. मात्र आरोपी रमेश हा रागाने धुमसत होता. त्याच संतापाच्या भरात त्याने घरी निघालेल्या कुणालवर मागून हल्ला केला आणि त्याच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात कुणाल गंभीर जखमी झाला असून इतर नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत त्याला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाख केले. दरम्यान हल्ल्याची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी रमेश याला अटक करत त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close