तरूणाची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक पूर्ववैमनस्यातून पेटलं भांडण

धुळे | 12 ऑक्टोबर 2023 मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून शहरातील शुभम साळुंखे या तरुणाचा खून करण्यात आला होता. घरावर दगदफेक केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन 8 ते 10 जणांनी त्याला एकटं गाठलं. आणि धारदार कोयता, फाईट व लोखंडी रॉडने शुभम साळुंखे याला बेदम मारहाण करुन त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. धुळे महापालिकेच्या वरखेडी रोडवरील कचरा डेपोमध्ये तो गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेथे मृत्यूशी सुरू असलेली त्याची झुंज संपली. शुभमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात 8 ते 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी विशेष पथके तयार करून तपास चक्र फिरवत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्यांनी खून केल्याचं कबूल केलं आहे. जुन्या वादातून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आले असून या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा पोलीस तपास करत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close