
पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या, लाखोंचे मोबाईलही जप्त
लातूर | लातूरमध्ये गुन्ह्यांचे प्रमाण भलतेच वाढले आहे. चोरी, दरोडा, लूटमारीच्या अनेक घटना सतत कानावर पडत आहेत. त्याच वेळी दीड महिन्यापूर्वी एका मोबाईल शॉपचे शटर उचकटून कोट्यवधी रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी पळवले होते. गस्तीवरील पोलिसांना गुंगारा देऊन मार्केट परिसरातील मोबाईलचे शॉप फोडून कोट्यवधींचे मोबाईल लुटण्याच्या घटनेमुळे शहरात गदारोळ माजला होता. अखेर दीड महिन्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत मोबाईल लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. याप्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ही चोरी झाली होती. लातूर शहरामधील गांधी मार्केट परिसरात पहाटच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील मध्यवर्ती भागातील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या बालाजी टेलिकॉम शॉपचे कुलूप तोडून, शटर उचकटून चोरट्यांनी पहाटे दुकानात प्रवेश केला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या दुकानापासून अवघ्या काही अंतरावरच पोलीस स्टेशन आहे. तरीही चोरट्यांनी डाव साधला.
पोलिस त्या चोरट्यांचा अथक शोध घेत होते. अखेर या प्रकरणी नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथून पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेत 75 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सुरू आहे.
Live Cricket
Live Share Market



