पाठोपाठ झालेल्या गुन्ह्यांनी शहर हादरलं दोन दिवस, दोन हत्या

 वाशिम | वाशिम जिल्हा पुन्हा एका हत्येमुळे हादरला आहे. मालेगाव तालुक्यातील एरंडा इथे भर वस्तीत मंदिरासमोर रॉडने मारून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. गजानन असे मृत इसमाचे नाव असून ते 45 वर्षांचे होते. दोन दिवसांपूर्वीच याच तालुक्यातील शिक्षकावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा हत्येचे सत्र सुरू झाल्याचे दिस आहे.

ऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एरंडा गावात भर वस्तीत असलेल्या मंदिराजवळ हा हल्ला करण्यात आला. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने गजानन यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या गजानन यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र ही हत्या नेमकी का करण्यात आली, त्याचे कारण काय हे अद्याप समजू शकलेले नाही.  लागोपाठ घडलेल्या या दोन हत्यांमुळे शहरात भीतीचं वातावरण असून हल्लेखोरांना लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावं अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे. जवुळका पोलीस या हत्येचा अधिक तपास करत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close