चारही मुलं फूटबॉल खेळण्यासाठी आली होती.अपघातात चौघे जखमी

4 ऑक्टोबर 2023 : सीएसटी जंक्शनजवळ असलेल्या मॅकडोनाल्डसमोर एका वृद्ध व्यक्तीच्या कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात चौघे जखमी  झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून चौथ्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. मंगळवारी रात्री हा अपघा झाला. ही चारही मुलं फूटबॉल खेळण्यासाठी आली होती.त्यानंतर चटवानी यांनी तिथून पटकन निघून जाण्याच्या उद्देशाने कारचा स्पीड वाढवला पण त्यांना कारवर ताबा ठेवता आला नाही.  तेथून चौघे जण पायी चालत जात होते. चटवानी यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने ती भरधाव वेगाने पुढे गेली आणि त्या चौघा जणांना धडकून पुढे गेली   या अपघातात सद्दाम अन्सारी (18), प्रवीण गुप्ता (18) आणि अजय गुप्ता (18) हे तिघे गंभीर जखमी झाले. तर विजय राजभर (17) याला किरकोळ दुखापत झाली त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ड्रायव्हरला करण्यात आली अटक

हा अपघात मंगळवारी संध्याकाळी 7.30 च्या सुमारास घडली. दिलीप चटवानी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे, असे डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले. चटवानी जी टिगो कार चालवत होते ती ऑटोमॅटिक होती आणि कारला अपघात झाला तेव्हा कारमधील एअर बॅग उघडली त्यामुळे त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, असे पोलिसांनी नमूद केले.अपघातामध्ये जखमी झालेली चारही मुले फुटबॉलपटू आहेत आणि GIFA स्पोर्ट्स क्लबकडून फुटबॉल खेळतात. कुलाब्याच्या वायएमसीए मैदानावर ते सरावासाठी आले होते. तेथून सीएसएटी स्टेशनवर जाऊन ते घरी जाण्यासाठी ट्रेन पकडणार होते. पुढील महिन्यात चौघंही फुटबॉलचा सामना खेळण्यासाठी बेळगावला जाणार होते, असे क्लबचे प्रशिक्षक हरीश गोलार यांनी सांगितले

 

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close