
तुळजापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणात आले*
आर्णी तालुक्यातील आदिवासी समाजाकडून आरक्षण बचावासाठी नागपूर तुळजापूर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणात आले
आर्णी: येथील आदिवासी समाजाच्या वतीने येरमे पेट्रोल पंप जवळ चक्काजाम आंदोलन करून नागपूर तुळजापूर महामार्ग बंद ठेवणत आला यामध्ये शेकडो आदिवासी बांधव पिवळे झेंडे घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते.
आर्णी तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने आयोजित भव्य आंदोलनात काही प्रमुख मागण्या आदिवासी समाजाच्या वतीने केल्या यामध्ये प्रामख्याने धनगर समाजाला आदिवासी समाजाचे आरक्षण देऊ नये, धनगर समाजाला लागू केलेल्या सवलतीताबडतोब बंद कराव्या आदिवासींमध्ये इतर जातीची घुसखोरी ताबडतोब थांबवावी, कंत्राटी नोकर भरतीचा शासन निर्णय रद्द करावा, वस्तीगृहातील डीबीटी बंद करून मेस तात्काळ सुरू करावी, आर्णी येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.



