५ लाखांचे मोबाईल पळवले भिंत फोडून दुकानात घुसले कुठे घडली ही चोरी ?

गोंदिया | 3 ऑक्टोबर 2023 : राज्यभरात गुन्ह्यांचे,चोऱ्यांचे सत्र वाढतच चालले आहे. यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र चोरही  दरवेळेस नवनव्या आयडियांचा वापर करून हात साफ करतात. यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

त्या रात्री नेमकं काय झालं ?

त्यांनी या दुकानातून महागडे असे तब्बल 28 मोबाईल पळवले. या सर्व मोबाईल्सची किंमत पाच लाख रुपयांहून अधिक असल्याचे समजते. सोमवारी सकाळी दुकानाचे मालक दुर्गेश पवार हे नेहमीप्रमाणे दुकानु उघडण्यासाठी आले , पण समोरचं दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या दुकानातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होत, मागील बाजूस असलेली भिंतही फोडण्यात आली, असेही त्यांना दिसले. आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मोबाइल वरून आमगाव पोलिस ठाण्यात संपर्क करून या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी आमगाव पोलिस पुढील तपास करत चोरांचा कसून शोध घेत आहेत.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close