
महिलांनी दिला ग्रामपंचायतच्या सचिवाला आंदोलनाचा इशारा
वसंत नगर पोफाळी येथील महिलांनी दिला ग्रामपंचायतच्या सचिवाला आंदोलनाचा इशारा
अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: वसंत नगर पोफाळी येथील जिल्हा परिषद शाळेजवळील तसेच श्रीकृष्ण मंदिराजवळील वस्तीत पथदिवे सुरू नाहीत तसेच या परिसरात ग्रामपंचायतीच्या नालीद्वारे सांडपाणी नाली सुव्यवस्थेत नसल्यामुळे घाण साचून परिसरातील नागरिकांचे स्वास्थ धोक्यात आले आहे तसेच या परिसरातील रस्ता नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्यावर चिखल व पाणी साचून त्या रस्त्यावरून जाणे येणे करणे अत्यंत कठीण झाले असून शालेय विद्यार्थी व जेष्ठ नागरिक रस्त्यावर पडून जखमी होत आहेत मागील अनेक वर्षापासून आपणास तोंडी व लेखी तक्रारी दिल्या परंतु कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही यापुढे ग्रामपंचायत मार्फत सुख सुविधा पुरविल्या नसल्यास नाईलाजास्तव लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा ग्रामपंचायतचे सचिव कोथळकर साहेब यांना पोफाळी येथील महिलांनी दिला
अनिकेत सुर्यवंशी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी



