
जालना घटनेच्या निषेधार्थ महागाव येथे सरकारची प्रेत यात्रा!
जालनाघटनेच्या निषेधार्थ महागाव येथे सरकारची प्रतिकत्माक प्रेत यात्रा काढण्यात आली
अनिकेत सुर्यवंशी जिल्हा प्रतिनिधी
महागाव::जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मागील काही दिवसापासून मराठा समाजाच्या
उपोषणाचे हत्यार उपसले असून त्यांना महाराष्ट्रातील मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एक सप्टेंबर रोजी याच ठिकाणी आंदोलन कर्त्यावर पोलिसांनी केलेल्या लाटीचार्जच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. यातील एक मोर्चा आज महागाव येथे सकल मराठा कुणबी समाज तर्फे महाराष्ट्र सरकारचे प्रेत यात्रा काढून निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांच्या तैलचित्रास हार अर्पण करून या सरकारला सर्वजनिक श्रद्धांजली अर्पण करून इथून पुढे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटोचे बॅनर बनवून प्रेत यात्रा काढली. मात्र पोलिसांनी हा मोर्चा डिटेक्ट करून पूर्ण साहित्य तब्यात घेऊन मोर्चे कतर्याना ताब्यात घेतली. या मोर्चे कतर्यानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या विरुद्धनारे देऊन पूर्ण महागाव शहर दणाणून सोडले होते. या प्रतिकात्मक प्रेतयात्रेमघ्ये झाला होता.