अख्खं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त !मामीसोबत भाचा फरार,नाराज मामाचं टोकाचं पाऊल;

लखनऊ |  उत्तर प्रदेशातील राणीपूर परिसरातील निजामपूर गावचे हे प्रकरण आहे. व्यवसायाने मजूर असलेला धरमचंद हा तेथे पत्नी आणि तीन मुलांसह रहात होता. मजुरीच्या कामासाठी तो अनेकदा घराबाहेर असायचा. मात्र त्याचवेळी धरमचंदच्या पत्नीचे भाच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू झालं. त्यानंतर १५ दिवसांपूर्वी ती आपल्या तीन निरागस मुलांना सोडून पुतण्यासोबत मुंबईला पळून गेली.

मुलांना जवळ बोलावलं आणि..  ही गोष्ट धरमचंद याला समजताच त्याला मोठा धक्का बसला. पत्नी सोडून गेल्यामुळे दु:खी झालेला तो अतिशय शांत आणि एकटा राहू लागला. त्याला तो धक्का सहनच झाला नाही. अखेर काल (रविवारी) रात्री त्याने त्याच्या तीन मुलांना जवळ बोलावलं, आणि त्यांना बिस्कीटं खायला दिली. वडिलांनी दिलेली बिस्कीट त्या निरागस मुलांनी लगेच खाल्ली, पण त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळू लागली. खरंतर, धरमचंद याने त्या बिस्किटांमध्ये विष मिसळले होते.एवढंच नव्हे तर त्याने स्वत:ही विषप्राशन केले. मुलांचं आयुष्य संपवून त्याला स्वत:लाही जीव द्यायचा होता. बिस्कीट खाऊन मुलांची आणि नंतर धरमचंद याची प्रकृती ढासळू लागल्याने, त्यांना आरडाओरडा सुरू केला. त्यांचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी घरी धाव घेतली आणि तेथील परिस्थिती पाहून त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णलयात दाखल केले. पण उपचारां दरम्यान दुर्दैवाने धरमचंद याचा मृत्यू झाला. तर त्याच्या तीन मुलांची प्रकृती अद्याप गंभीर आहे. वडिलांनी दिलेलं ते बिस्कीट त्या तीन चिमुरड्यांनी आनंदाने खाल्लं, पण त्यामध्ये असं काही असेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. आता ते मृत्यूशी झुंज देत आहेत.या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी मुलांची स्थिती जाणून घेतली. टुंबिक तणावामुळे या मुलांचे वडील धरमचंद यांनी आपल्या मुलांना विष पाजले आणि स्वतः विष प्राशन केले, त्यामुळे धरमचंदचा मृत्यू झाला. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close