
काटोल पंचायत समितीकडून माजी सैनिकांचा सत्कार
काटोल पंचायत समितीकडून माजी सैनिकांचा सत्कार
काटोल – स्वातंत्र्यदिनी पंचायत समिती, काटोल कडून देशाच्या सीमेवर रक्षण करणारे माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती संजयजी डांगोरे, गटविकास अधिकारी दिपकजी गरुड, उपसभापती निशिकांतजी नागमोते, पं.स.सदस्य अनुराधा खराडे, धम्मापाल खोब्रागडे, अरुण उईके,चंदा देव्हारे,लता धारपुरे,प्रतिभा ठाकरे,गटशिक्षणाधिकारी नरेश भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
माजी सैनिक रामहरी टेकाडे यांचे 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील विशेष योगदानाबद्दल, रत्नाकर ठाकरे यांचा 1999 च्या कारगिल युद्धातील सहभागाबद्दल शाल, श्रीफळ,सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती संजय डांगोरे म्हणाले की, देशाच्या सीमेचे रक्षण करण्याकरिता सैनिक उभा असतो.ते सीमेवर असतात म्हणून आपण सुरक्षित आहे.माजी सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे.म्हणून आपण माजी सैनिक रामहरी टेकाडे व रत्नाकर ठाकरे ,अरविंद उमप ,श्री लोनकर यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.



