बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा व शहर च्यावतीने अभिवादन.

बोधिसत्व परमपूज्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा व शहर च्यावतीने अभिवादन..

आज बुधवार ६ डिसेंबर रोजी संविधान चौक नागपूर या ठिकाणी बहुजन समाज पार्टी नागपूर जिल्हा व शहरच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर जिल्हा व शहरच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याच सोबत दीक्षाभूमी या ठिकाणी सुद्धा बाईक रॅलीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. आणि तसेच दक्षिण नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा अभिवादन करून बाईक रॅलीच्या माध्यमातून प्रचार प्रसार करण्यात आला.
यावेळेस कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे! “बाबा का मिशन अधुरा बीएसपी करेंगी पुरा.! “जब तक जान बाकी है तब तक बाबा आपका मिशन जारी है!
“बाबा का हाथी आया है बीएसपी ने लाया है! अशा पद्धतीचे नारे जयघोष देऊन कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी व त्यांच्या जीवन संघर्षाला समाजापर्यंत पोहोचण्याकरिता व सत्ता प्राप्ती करण्याकरिता मोठ्यप्रमाणावर कार्यकर्त्यांनी संकल्प करून त्यांना अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमांमध्ये, बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव विजयकुमार डहाट, प्रदेश सचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश सचिव राजीव भांगे यांच्या प्रमुख मार्गदर्शन व उपस्थितीमध्ये
तर नागपूरचे जिल्हाध्यक्ष ओपुल तामगाडगे यांच्या नेतृत्वामध्ये अभिवादन कार्यक्रम व बाईक रॅलीच्या माध्यमातून बुद्ध वंदना घेण्यात आली होती. यावेळेस माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, बसपाचे नगरसेवक मोहम्मद इब्राहिम टेलर, जिल्हा सचिव धनराज हाडके, शहर प्रभारी विकास नारायने, शहर उपाध्यक्ष उमेश मेश्राम, शहर महासचिव विलास बनसोड, नागपूर महिला जिल्हा नेत्या सुरेखाताई डोंगरे , रंजनाताई घरडे , वर्षाताई वाघमारे, जिल्हा BVF संगीत बाबू इंगळे, शहर सदस्य अजय गायकवाड, चंद्रसेनजी कांबळे, सुधाकर सोनपिपडे, जितू पाटील, जगदीश गेडाम, अश्विन पाटील, पंकज नाखले, वैभव देवगडे, शंकर थूल, विलास मून, अशोक रंगारी, संभाजी लोखंडे, वासुदेव मेश्राम, महिपालजी सांगोडे, सावलदास गजभिये, तपेश पाटील, अनिल मेश्राम, बंडू सुखदेवे, वीरेश वरखडे, मनोज गजभिए, मनोज निकाळजे बामसेफचे जनार्दन मेंढे, भास्कर कांबळे, अंकित थूल, श्रीकांत बडगे, धर्मपाल गोंगले, मिलिंद वाळके कनिक्ष व हिमांशू गोंगले, कार्यकर्ते गुरुपालजी बोरकर, इसासानीचे प्रशांत दिवे, श्रावण गोस्वामी, जयस गायमुखे, अनुराग गवळी, विनोद नारनवरे, प्रताप तांबे, उत्तम जगदीश गजभिये, विवेक सांगोडे, इत्यादी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे आभार सुमित जांभूळकर यांनी मानले.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close