
घोगरा येथील कामगाराचा करंटने मृत्यू
घोगरा येथील कामगाराचा करंटने मृत्यू
हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विहार पेठ येथे कामगाराचा विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली
सविस्तर वृत्त असे की नरखेड तालुक्यातील घोगरा येथील रहिवासी राजेंद्र गुजवार हा एका ठेकेदाराकडे विजेच्या लाईनचे लाईनचे काम काही महिन्यापासून करीत होता दररोज ठरल्याप्रमाणे तो हिंगणा तालुक्यातील विरार पेठ येथे विजेचे काम करण्यासाठी गेला होता तो काम करीत असताना त्याला अचानक करंट लागल्याने खाली कोसळला आणि मरण पावला. राजेंद्र अजाब गुजवार राहणार घोगरा तालुका नरखेड जिल्हा नागपूर असे मृतकाचे नाव आहे. या घटनेची माहिती मृतकाचे वडील यांना कळतात घटनास्थळ गाठून यांना पोलीस स्टेशन येथे माहिती दिली. हिंगणा पोलीस ठाण्यातील तपास अधिकारी यांनी कारवाई पूर्ण करून उत्तरिय तपासणीनंतर नातेवाईकांना मृतदेह देण्यात आला. राजेंद्र मागे एक मुलगा एक मुलगी पत्नी असा आप्त परिवार असून त्याचे अंतिम संस्कार घोगरा येथील मोक्षधाम येथे करण्यात आले.त्याचा मृत्यूमुळे गावात हळद व्यक्त केली जात आहे
Live Cricket
Live Share Market



