
ईडीनेची 10 ठिकाणी छापेमारी
ईडीने आज 10 ठिकाणी छापेमारी केली. आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीची धाड टाकली. तसंच संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या घरावर आणि कार्यालयात ईडीने चौकशी केली. या सगळ्या प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर टीका केली तसंच इशाराही दिलाय. शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. सुरज चव्हाण यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात सुरु करण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर, तसेच मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याच आरोपांप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने नुकतंच सुरज चव्हाण यांच्या घरी छापा टाकला होता. या छापेमारीत ईडीच्या हाती महत्त्वाची कागदपत्रे लागल्याची माहिती समोर आलीय. त्यानंतर आता चव्हाण यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. सुरज चव्हाण यांना ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ईडीने चव्हाण यांना येत्या सोमवारी 26 जूनला चौकशीचं समन्स बजावलं आहे. या प्रकरणी ईडीने सनदी अधिकारी संजीव जयस्वाल यांना आज चौकशीचं समन्स बजावलं होतं. पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे त्यांची चौकशी होऊ शकले नाहीत. संजीव जयस्वाल हे करोनो काळात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते.ईडी अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरावर धाड टाकली. ईडी अधिकाऱ्यांनी दिवसभर चव्हाण यांच्या घराची झाडाझडती घेतली. ईडी अधिकारी सकाळी 9 वाजता सुरज चव्हाण यांच्या घरात गेले होते. त्यानंतर ते रात्री दीड वाजताच घराबाहेर पडले. तब्बल 17 तास त्यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आली.