
विदर्भ दर्पण news बुलेटिन
१५ जूननंतर मान्सून येणार
नागपूर हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात मान्सून 15 जूनच्या नंतरच येणार आहे. केरळमध्ये अजून मान्सूनची परिस्थिती निर्माण झाली नाही. त्यामुळे 15 जूनच्या आधी विदर्भात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे.
कृषी मंत्र्याकडूनच कारवाईला सुरुवात
राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच बोगस बियाणे विकणाऱ्यांचाही राज्यात सुळसुळाट झाला आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट येत असतानाच पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केल्यानंतर मात्र काही बियाणे बोगस निघत आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांवर निसर्गाचे संकट तर दुसरीकडे बोगस बियाणांची पेरणी झाल्यामुळे योग्यरित्या उगवण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावत आहे. त्यामुळेच आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट कारवाईला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांनी शिवसेनेच्या जाहिरातीवरुन भाजपची . उडवली खिल्ली
राष्ट्रात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे असं म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक 26 टक्के कौल दाखवण्यात आला आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून 23 टक्के कौल दाखवण्यात आला आहे. या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेतील मतभेद समोर आला असतानाच अजित पवार यांनी सत्ताधारी दोन्ही पक्षांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
- काटोल पंचायत समितीला महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक
गामिन भागातील विकास कामात पंचायत समितीचे मोठे योगदान असते पंचायत राज संस्थानी केलेल्या कामगिरी नुसार प्रोसाहित करून त्यांची कार्यसमता वाढविणे यासाठी विभागस्तर व राज्यस्तरावर यशवंत पंचायत राज अभियान हि योजना सुरु केली आहे -२०२१ -२२ या वर्षात काटोल पंचायत समितीनि उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे यशवंत पंचायत राज अभियानात राज्यस्तर पुरस्कारासाठी दुतीय क्रमाकावर काटोल पंचायत समितची निवड करण्यात आली आहे सभापती संजय डागोरे या संबंधाने विशेष बैठक १३ जून रोजी पंचायत समिती काटोल येथे आयोजित करून सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांचे आभार मानले येण्या दिवसात प्रथम क्रमांकसाठी सर्वांनी काम करावे असे ते मार्गदर्शनात म्हणाले यावेळी माजी उपसभापती अनुराषा खाराळे ,माजी सभापती खोब्रागडे , खडविकास अधिकारी संजय पाटील सह सर्व पदाधिकारी उप्स्तीत होते