उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा

सोलापूर : राज्यातील शेतकरी सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यातच शेतमालाला ना योग्य बाजारभाव मिळतो, ना शेतीपिकासाठी योग्य निसर्गाची साथ मिळते त्यामुळे राज्यातील बळीराजा संकटांचा सामना करत आहे. त्यातच सरकारकडून फक्त अश्वासनांची खैरात होते, प्रत्यक्षात मात्र ना मदत मिळते ना सरकार शेतकऱ्यांच्या कामी येते. यामुळेच आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस सोलापूर दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांना इशारा देत देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.सोलापुरातील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त ते उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत.त्यामुळे आता शेतकऱ्यांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा ताफा अडविण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की, शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांना अखिल भारतीय किसान सभेने इशारा दिला आहे.महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडले आहेत. तर सोलापूर जिल्ह्यातही गतवर्षी झालेल्या खरीप, रब्बी पिकांच्या नुकसान भरपाईचे अनुदान अद्याप शेतकर्‍यांना मिळाले नाही.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचीही थकीत 385 कोटी रुपये शेतकर्‍यांना कारखानदारांकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ते बिल शेतकऱ्यांनी तात्काळ मिळावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.नाशिकच्या लाँग मार्चला दिलेले आश्वासन अशा या विविध मागण्यांची पूर्तता होत नसल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा अडविणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला असून शेतकऱ्यांना दिलेली अश्वासनं पूर्ण करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.फडणवीस यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ होणार असल्याने त्यांच्या या  शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. याबाबतचे शेतकऱ्यांनी मंद्रूप पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे.

Live Cricket Live Share Market

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...

Related Articles

Back to top button
Close
Close