
आशिष देशमुख भाजप मध्ये जाणार ?
नागपूर :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटोल आणि सावनेर ला आढावा बैठक घेऊन कार्यकर्त्यात आणि नागरिकात उत्साह वाढविला .
तसेच राजकीय भाषेत म्हण्याचे तर एका दगडात दोन शिकार केल्या .काटोल आणि सावनेर मध्ये भाजप चे प्रभावी उमेदवार आणि आपला मतदार क्षेत्र सुरक्षित असा डाव देवेंद्र फडणवीस यांचा असावा.. आशिष देशमुख सध्या भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. याचे कारण म्हणजे आज देवेंद्र फडणवीस यांनी आशिष देशमुख यांच्या घरी जाऊन भेट घेतली. यावेळी आशिष देशमुख हे सावनेरमधून भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचंही बोललं जाते. परंतु, आशिष देशमुख यांनी घोडामैदान अजूनही दूर असल्याचं सांगून यावर बोलणं टाळलं. आशिष देशमुख म्हणाले, आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित आहे. निलंबन मागे घेऊन अॅक्टिव्ह करण्यात येईल.. . २०१४ मध्ये काटोलमध्ये अनिल देशमुख यांचा पराभव केला. २०१९ ची निवडणूक मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लढवली होती. सध्यातरी पक्ष बदलाचा प्रश्न उद्भवत नाही, असे माहिती देशमुख यांनी दिली .विदर्भाच्या विकासात फडणवीस यांची मोठी भूमिका 
देशमुख यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस यांनी नाश्त्याच्या आनंद घेतला. भाजपचे दिग्गज नेते भेटीला आले. राज्यातील पातळीवरील नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून विदर्भात विकासाचे कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. विदर्भाच्या दृष्टीने कोणी एकमेव काम करणारा असा नेता आहे.



