
नागपूरमध्ये प्रोफाइल सेक्स रॅकेटचा
नागपूरमध्ये घटना उघड
नागपुरातील एका स्टार हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भंडाफोड केला आहे, याप्रकरणी दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे. एका उजबेकिस्तानच्या तरुणीसह दिल्लीच्या 2 तरुणींनीची सुटका केली आहे.
नागपूरच्या वर्धा मार्गावर असलेल्या एका पॉश हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची गुप्त माहिती नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी या हॉटेलमध्ये सापळा रचून 2 दलालांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये बिलाल अहमद आणि राजकुमार गडेलवार यांचा समावेश आहे. व्हाटसॲपच्या माध्यमातून हे दलाल ग्राहकांशी संपर्क साधून त्यांना तरुणी उपलब्ध करून द्यायचे. या प्रकरणी उजबेकिस्तान येथून आलेली एक तरुणी आणि दिल्ली येथील 2 तरुणींची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.



