
विदर्भ दर्पण news बुलेटिन
अरविंद केजरीवाल चा भाजप वर टीका !
गेल्या वर्षभरापासून भाजपाकडून उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी आमच्यावर आरोप केले जात आहेत. त्यानंतर तपास यंत्रणाही सर्व कामं सोडून आमच्या मागे लागल्या आहेत. सीबीआय आणि ईडीकडून रोज कोणालातरी पडकडून त्रास दिला जातो आहे. त्यांच्यावर आमच्याविरोधात बोलण्यासाठी दबाव आणला जातो आहे”. असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना केला. देशात नेमकं काय चाललंय
“मला काल सीबीआयने समन्स बजावले. त्यांनी आमच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. यादरम्यान त्यांनी आतापर्यंत अनेकदा आमच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. मात्र, त्यांना एक रुपयासुद्धा मिळालेला नाही. मला पंतप्रधान मोदींना विचारायचं आहे की या देशात नेमकं काय चाललंय? त्यांना वाटत असेल की मी चोर आहे, तर मग या पृथ्वीतलावर कोणीही इमानदार नाही”, असेही ते म्हणाले.तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही उपस्थित केले ! त्यांनी यावेळी तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सीबीआय आणि ईडीने न्यायालयातही खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली आहेत. एकीकडे मनीष सिसोदिया यांनी त्यांचे १४ फोन नष्ट केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे त्यापैकी चार फोन सध्या सिसोदियांकडे आहेत, असंही ईडीचं म्हणणं आहे. मग सिसोदियांनी जर १४ फोन नष्ट केले, तर त्यांच्याकडे चार फोन कसे काय? याचाच अर्थ तपास यंत्रणांनी खोटं बोलून आमच्यावर गुन्हे दाखल केला आहे”, असा आरोप त्यांनी केला.
संजय राउत यांनी घेतली अनिल देशमुख़ यांची भेट
नागपूर ला महाविकास आघाडी ची वज्रमुठ सभा १६ एप्रिल ला होणार आहे .या निमित्याने शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेतली . या भेटी मागे सभेच्या नियोजन वर देशमुख यांच्या घरी सविस्तर चर्चा करण्यात आली . त्यामुळे अनिल देशमुख यांना पत्रकरांनी विचारलेल्या प्रस्नाना समोर जावे लागले.आपण उया भाषण करणार असा प्रश्न उपस्थित केला . त्यामुळे अनिल देशमुख काही वेळा करिता अनुत्रीत झाले होते असे अनिल देशमुख प्रसार माध्यमाशी बोलत होते –
सुभास नोरोलिया कडून बुद्धविहारा करिता गेटची मदत
काटोल तालुक्यातील डोगारगाव च्या बुद्धविहारा
साठी सुजल कंपनीचे मालक व सामाजिक कार्यकते सुभास नोरोलिया यांनी बुद्धविहारा करिता स्वरक्षण गेटची मदत केली – त्यामुळे ग्रावासियानी त्यांचे स्वागत केले –
जुनेवाणीत डॉ बाबासाहेब आबेडकर जयंती साजरी 
माजी जिल्हा परिषद सदस्य यादोराव आह्के , पत्रकार नीलकंठ गजभिये , व गावकर्यांच्या उपस्तीत डॉ बाबासाहेब आबेडकर जयंती साजरी



